A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorized

नारिवली परिसरातील ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य शिबीर व कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न

ठाणे:- मुरबाड तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या नारिवली गावामध्ये आज पांडुरंग कृपा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सेंटरचे सुट्टीतील विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन व नारवली परिसरातील ग्रामस्थांसाठी मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन व मोफत प्रशिक्षणासाठी जागा गावचे ज्येष्ठ नागरिक शंकर विशे यांनी उपलब्ध करून दिली त्यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले

तसेच या कार्यक्रमाला आवर्जून सह्याद्री विद्यालय नारवलीचे माजी मुख्याध्यापक गोविंद भोईर सर तसेच डी वाय फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा पंचायत समितीचे सी आर पी च्या प्रमुख एफएलसीआरपी तथा जिल्हाध्यक्ष ग्रामीण महिला डी वाय फाउंडेशन चारुशीला गायकर मॅडम डी वाय फाउंडेशन या संस्थेचे सल्लागार उमेश चौधरी पांडुरंग कृपा कॉम्प्युटर क्लासच्या संचालिका योगिता घागस मॅडम पांडुरंग कृपा कॉम्प्युटरचे संचालक तथा डी वाय फाउंडेशन चे मुरबाड तालुक्याचे अध्यक्ष तानाजी घागस सर उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी गावच्या सीआरपी मनीषा भोईर बांगरपाडच्या कृषी सखी शुभांगी दळवी इनफियो नेत्र तपासणी हॉस्पिटलचे रोहित झुंजारराव व्यवस्थापक सायली पवार डॉक्टर सतीश तांबाने घरत तसेच सागर परटोले तसेच साई प्रवीण हॉस्पिटल च्या डॉक्टर मयुरी शिरोशे डॉक्टर शुभांगी दळवी उपस्थित राहून ग्रामस्थांची बीपी शुगर सुविधा प्रकारच्या रोगांची निराकरण केले तसेच ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण महिनाभर घेतले त्यांना कॉम्प्युटरचे प्रमाणपत्र सहभागाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला मोफत मंडप स्पीकर ची व्यवस्था राजाराम मारुती भोईर संजय डेकोरेशन नारिवली यांनी करून दिली नारिवली येथे ग्रामस्थ कार्यक्रमाला अरुण भोईर कैलास भोईर गोविंद विशे शंकर म्हडसे बाळू शांताराम बांगर रोहिणी बाळू भोईर उपस्थित होत्या सह्याद्री विद्यालयाच्या पालक संघाच्या सचिव योगिता नामदेव ठाकरे या सुद्धा आवर्जून उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन पांडुरंग कृपा कॉम्प्युटर क्लासचे व्यवस्थापक मधुकर भांडे सर व सहशिक्षिका अक्षदा रमेश गायकवाड मॅडम तसेच क्लासचे जयश्री गोविंद विशे गायत्री रमेश कंटे यांनी केले होते गावांमध्ये कॉम्प्युटर प्रशिक्षण चालू केले व गावातच सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना सोय करून दिल्याबद्दल पांडुरंग कृपा कॉम्प्युटर क्लासचे विद्यार्थ्यांनी धन्यवाद व्यक्त केले अतिशय आनंदी वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला मोठ्या संख्येने या कार्यक्रमात ग्रामस्थांनी आपल्या आरोग्याची व नेत्र तपासणी करून घेतली व सर्व मान्यवरांचे व आयोजकांचे धन्यवाद व्यक्त केले खालील विद्यार्थ्यांना मोफत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!