
भोसरी…..जेठमल मुथा वंदेभारत लाईव्ह टीव्ही न्युज जिल्ला प्रमुख पुणे
पवनानगर येथे रस्त्याच्या कडेला गवत असून, त्याला शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे रस्त्यालगत उभ्या असलेल्या मोटारींनी पेट घेतला. या आगीत सहा मोटारींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच महापालिका पिंपरीतील मुख्य अग्निशमन केंद्र, रहाटणी उप अग्निशमन केंद्राच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी आगीवर पाण्याचा फवारा मारून एक तासात आगीवर नियंत्रण मिळवले.
ही कारवाई अग्निशमन दलाचे लिडिंग फायरमन किरण निकाळजे फायरमन कैलास वाघेरे, भूषण येवले, संतोष कदम, प्रमोद जाधव, सिद्धेश दरवेश, प्रतीक खांडगे, ओंकार शिंदे, शुभम क्षीरसागर, समीर पोटे, ऋषिकेश जगताप, ओंकार रसाळ, संकेत घोगरे यांनी केली.