A2Z सभी खबर सभी जिले कीLok Sabha Chunav 2024Uncategorizedअन्य खबरेमहाराष्ट्र
एम जे एफ मध्ये योग दिन संपन्न

संजय पारधी बल्लारपूर
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आज दिनांक 21 जून रोजी संपन्न झाला . योग दिनाकरिता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. चव्हाण सर व एनसीसी विभागाचे ए. एन. ओ. प्राध्यापक योगेश टेकाडे आणि ग्रंथालय प्रमुख प्राध्यापक डॉ. पंकज कावरे उपस्थित होते . तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी योग केल्यानंतर योगाचे महत्त्व समजावून सांगितले . त्यानंतर सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या . तत्पूर्वी सामूहिक सूर्यनमस्कार करताना विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार अर्थात अष्टांग योगामुळे मानवी शरीरात असणाऱ्या व्याधी कशा दूर होतात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.