
दिनांक १७/०५/२०२४ रोजीचे पहाटे दरम्यान पो.स्टे मौदा हद्दीत स्टाफसह अवैध गोवंश वाहतुकीस अडथळा घालण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना भंडारा ते नागपूर नॅशनल हायवे ५३ वर बोलेरो pick-up ने अवैधरित्या निर्दयतेने गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने मौजा गुमथळा येथे नाकाबंदी सुरू केली, नाकाबंदी दरम्यान एक बोलेरो pick-up येताना दिसली त्या वाहनावर संशय आल्याने त्यास टॉर्चच्या साहाय्याने ईशारा देऊन थांबविण्यास सांगितले असता काही अंतरावर जाऊन वाहन थांबविले. वाहनातून उतरून चालकाने शेतशिवरातून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.