अखंड भारत न्यूज प्रतिनिधी नितीन राठोड
सातारा तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी
जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील यांनी सातारा तालुक्यातील चिंचणी, कण्हेर, नुनेव कोंडवे या गावांना भेट देऊन दुष्काळी परिस्थितीचे पाहणी केली.
यावेळी पिकांची स्थिती, पाणी उपलब्धता शेतकऱ्यांच्या अडचणीची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या . यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी तलाठी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
