A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedअन्य खबरेक्राइममहाराष्ट्र

इंदौरमधून गुटखा तस्काराला अटक; स्थानिक गुन्हेशाखेची कामगिरी

मुंबई-आग्रा महामार्गावर पकडण्यात आलेल्या कंटेनरमधून २१ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता.

प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर,नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर पकडण्यात आलेल्या कंटेनरमधून २१ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्यातील गुटखा तस्करास स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने इंदौरमधून अटक केली आहे.

    इसरार मन्सुरी मुस्ताक मन्सुरी (३५, रा. श्रमिक कॉलनी, राऊ, इंदौर, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या गुन्ह्यात अमृत भगवान सिंह (रा. वडवेली, ता. खिलचीपूर, जि. राजगड मध्यप्रदेश), पूनमचंद हौबा चौहान (रा. सकारगाव, ता. बिकनगाव, जि. खरगोन, मध्यप्रदेश) या दोघांना यापूर्वीच अटक केलेली आहे.

      गेल्या १४ तारखेला स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी हद्दीमध्ये कंटेनर पकडला असता, त्यातून २१ लाखांच्या प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी इगतपुरी पोलिसात गुन्हा दाखल होता. दोघा संशयितांच्या चौकशीतून संशयित मन्सुरी याचे नाव निष्पन्न झाले

       मन्सरी गुटख्याचा साठा करून तो बंद कंटेनरमधून अनेक राज्यांमध्ये गुटख्याची तस्करी करीत असल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने इंदौर परिसरात संशयिताचा माग काढत शिताफीने सापळा रचून अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता, शुक्रवारपर्यंत (ता. १) पोलीस कोठडी सुनावली आहे.

      सदरची कामगिरी अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, उपनिरीक्षक संदीप पाटील, चेतन संवत्सकर, योगेश कोळी, गिरीश बागुल, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, कांचन भोजने, योगेश भावनाथ, प्रकाश कासार यांच्या पथकाने बजावली.

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!