अखंड भारत न्यूज चॅनल. प्रतिनिधी नितीन राठोड
खटाव तालुक्यातील निमसोड व परिसरातील वीज वितरक्त डीपीवरील फ्युज बॉक्स तात्काळ बंदिस्त करावे
अन्यथा एखादा मोठा अपघात होऊ शकतो पावसाळ्यात लहान मुले रस्त्याने ये जा करत असतात व परिसरातील शेतकरी आपली जनावरे खाण्यासाठी परिसरात सोडत असतात त्यामुळे एखादा मोठा अपघात होऊ शकतो शेतकरी आपल्या विहिरीवरील मोटरी चालू करण्यासाठी ये जा करत असतात.
काही परिसरात शेतकऱ्यांचे उसाचे पीक आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान टाळण्यासाठी तात्काळ उपायोजना करून वीज वितरक्त महामंडळाने एमएसईबी बोर्ड व वायरमेन यांनी तात्काळ फ्युज बॉक्स बंदिस्त करून घेणे अन्यथा होणाऱ्या नुकसानीस प्रशासन व एम एस सी बी बोर्ड व वीज वितर्क महामंडळ जबाबदार राहील येत्या . अन्यथा निमसोड व वाडी वस्तीवरील नागरिकांचा वीज वितरक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
