
दिनांक १७/०५/२०२४ रोजी पहाटे दरम्यान पो.स्टे मौदा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना भंडारा ते नागपूर नॅशनल हायवे ५३ वर बोलेरो पिकअपने अवैधरीत्या निर्दयतेने गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने नाकाबंदी सुरू केली, नाकाबंदी दरम्यान एक बोलेरो पिकअप येताना दिसली त्या वाहनावर संशय आल्याने त्यास टॉर्चच्या साहाय्याने ईशारा देऊन थांबविण्यास सांगितले असता त्याने काही अंतरावर जाऊन वाहन थांबविले. आपण पकडले जाऊ म्हणून वाहनचालकाने शेतशिवरातून अंधाराचं फायदा घेउन पळून गेला. सदर वाहनाचा क्लिनरला पकडण्यात यश आले.सदर वाहनाची पाहणी केली असता बोलेरो पिकअप क्रं. MH-३६/AA-३२४१ मध्ये १२ गोवांशिय जनावरे अत्यंत निर्दयतेने कोंबून, आखूड दोरखंडाने बांधून कत्तली करिता जाताना दिसून आले.
सदर गाडीमधील गोवांशिया जनावरांना योग्य व्यवस्थपनार्थ ज्ञान फाउंडेशन गोरक्षण केंद्र भंडारा येथे दाखल करून आरोपी विरुद्ध कलम ११(१) (d) (f) (e) प्रा.अधि.१९६०, सहकलम ५ अ (१), ९ महा.प्रा.सं.सुधारित अधि.२०१५ सहकलम ४२९,२७९ भां.द.वि सहकलम १८४ मोक्का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
सदरची कार्यवाही ही मा.पोलिस अधीक्षक नागपुर ग्रामीण हर्ष पोद्दार,मा.अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ,मा.उपविभागीय पो.अधि.कामठी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पो.नि.सतिशसिंह राजपूत,महेश बोथले,संदीप कडू,गणेश गुदमाळी,रुपेश महादुले,दीपक दरोडे, अतिश गाढवे यांनी केलेली आहे.