A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedदेशमहाराष्ट्रलाइफस्टाइल

आवास योजनेंतर्गत घरकुल मिळावे : पालकमंत्री दादाजी भुसे

मालेगाव येथील कृष्णा लॉन्समध्ये शबरी आवास, रमाई आवास, मोदी आवास योजनेचे घरकुल मंजुरी आदेश वाटप व जनसुविधा योजनेंतर्गत मंजूर कामांचे ग्रामपंचायतींना आदेश वाटप करण्यात आले.

मालेगाव प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर : गरजूंना हक्काचे घर मिळावे यासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवीत आहे. प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास, रमाई आवास व मोदी आवास योजना आदी घरकुल योजनांच्या माध्यमातून तालुक्यातील लाभार्थींना घरकुले मंजूर झाली आहेत. लाभार्थींनी दर्जेदार व सोयी सुविधायुक्त घरे बांधावीत असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

    मालेगाव येथील कृष्णा लॉन्समध्ये शबरी आवास, रमाई आवास, मोदी आवास योजनेचे घरकुल मंजुरी आदेश वाटप व जनसुविधा योजनेंतर्गत मंजूर कामांचे ग्रामपंचायतींना आदेश वाटप करण्यात आले, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, कृषी अधिकारी किरणकुमार शिंदे यांच्यासह विविध गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी, लाभार्थी उपस्थित होते.

     श्री. भुसे म्हणाले, मालेगाव तालुक्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या विविध आवास योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना २०२३-२०२४ या वर्षात एकूण १ हजार ८७० घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. जनसुविधा योजनेंतर्गत ग्रामपंचायत इमारत बांधकाम, स्मशानभूमी कुंपण भिंत आदी कामे करण्यात येतात.

     या वर्षात ३८ ग्रामपंचायतीसाठी ३ कोटी ९२ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. रावळगाव-अजंग परिसरात एमआयडीसी, महिला रुग्णालये आदी विविध विकासकामे प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!