अखंड भारत न्यूज प्रतिनिधी नितीन राठोड
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आंदोलन
आजोबांचा मृत्यू नाही खून आहे म्हणत नातवाने कुटुंबासह वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्याल या येथे आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी वडूज पोलिसांनी त्यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांना ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडील ज्वलनशील पदार्थ असलेला कॅंन पोलिसांनी हिसकावून घेत त्याला आत्मदहन करण्यापासून परावृत्त केले आहे. वाघमोडवाडी ता मान येथील बयाजी वाघमोडे या वृद्धाची
वारस हक्काच्या वादातून हत्या करण्यात आल्याचा
आरोप व या हत्येस कारणीभूत असलेल्या इसमांवर
खूणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुमन विठ्ठल
शिंगाडे (रा.
शिंगडवाडी ) व चांगूना किसन सरक ( रा.नंदन , फलटण) उत्तम शिंगाडे रा. सिंगारवाडी
यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती.
मात्र त्यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी आज वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालय येथे आत्मदहनाचा प्रयत्न केला.
