A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedअन्य खबरेक्राइमनासिकमहाराष्ट्र

मालेगाव येथील अव्वल कारकून लाच घेताना जाळ्यात

रेशन कार्ड नोंद ऑनलाईन करण्यासाठी 22 हजारांची लाच घेताना मालेगावात अव्वल कारकून जाळ्यात

प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर मालेगाव,नाशिक : रेशन कार्ड मधील नोंदी ऑनलाईन करण्यासाठी 22 हजारांची लाच घेताना मालेगाव येथील धान्य वितरण कार्यालयातील अव्वल कारकून रवींद्र बळीराम दहिते यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

      तक्रारदार हे मालेगाव येथील असून त्यांचा लाकूड खरेदी विक्री चा व्यवसाय आहे. ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत. मालेगाव येथील 15 गरीब व गरजू कुटुंबाचे अंत्योदय आणि व पिवळे रेशन कार्डाची रेशन मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी प्रकरणे सादर केली आहेत. तक्रार दार हे मालेगाव येथील धान्य वितरण कार्यालयात गेले असता अव्वल कारकून रवींद्र दहिते यांनी प्रत्येक कुटुंबाचे 1500 रुपये याप्रमाणे एकूण15 कुटुंबातील रेशन कार्डाची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी एकूण 22500 रुपये मागितले, तक्रारदार यांनी हे पैसे दहिते यांना दिले. त्यापैकी500 रुपये तक्रारदार यांना परत देत 22 हजार रुपये लाच स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर पोलीस नाईक दीपक पवार, संजय ठाकरे यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS
Back to top button
error: Content is protected !!