
अखरे सदर प्रकरणात कन्हान पोलिसांनी कलम ३०७ आणि अट्रोसिटी कायद्या अंतर्गत कलम वाढ करून गुन्हा नौदविला.
मी जयवंत हरिदास थोरात रा.राधाकृष्ण नगर कन्हान पोस्ट कन्हान जी.नागपूर येथे राहत असतो. मी अनुसूचित जाती माहार जातीच्या आहे . मी अपंग सुद्धा आहे.माझा शेजारी प्रणय बावनकुळे, श्याम बावनकुळे राहात असतात.दिनांक ०६/०५/२०२४ रोजी प्रणय बावनकुळे, श्याम बावनकुळे यांनी रात्री ११.०० वाजताच्या सुमारास द्रवेष बुदधीने लोखंडी रोडने माझावर जानलेवा भ्याड हल्ला करुन माझे डोके फोडून मला गंभीर दुखापत करुन ईजा व हानी पोहचवून रक्त बंबाळ केले होते. कन्हान पोलिसांनी दिनांक. ०६/०५/२०२४ रोजी प्रणय बावनकुळे , श्याम बावनकुळे यांचा विरुद्धध अपराध क्र.३१२/२०२४ कमल ३२६,३२३,५०४,५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करविला. माझा तक्रारी प्रमाणे कन्हान पोलिसांनी आरोपी विरुद्धध कमल ३०७ व अट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद केला नाही. कन्हान पोलिसांनी अपराध क्र. ३१२/२०२४ मधील आरोपी प्रणय बावनकुळे , श्याम बावनकुळे यांचा विरुद्धध कलम ३०७ व अट्रोसिटी गुन्हा दाखल केला नसून आरोपी प्रणय बावनकुळे, श्याम बावनकुळे यांचा कडून लाच घेऊन कायद्याचा विपरीत नियमबाह्य तपास करुन आरोपी प्रणय बावनकुळे, श्याम बावनकुळे यांना वैध शिक्षे पासून वाचविले होते. अपराध क्र. ३१२/२०२४ मधील आरोपी प्रणय बावनकुळे, श्याम बावनकुळे यांनी काही राजकारणी लोकांनी आपल्या हाताशी घेऊन तसेच कायद्या आपल्या हाताशी घेऊन अर्जावर व माझा पत्नीला तसेच परिवारातील लोकांनी कन्हान पोलिस स्टेशन येथे दाखल केलेला अपराध क्र.३१२/२०२४ मागे घेण्यासाठी दबाव, दडपण,प्रलोभन तसेच जिवाणी मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. सामाजिक कार्यकर्ते इंजी. अॅड रोशनीताई अतुल गजभिये यांनी मला व माझा पत्नीला विधी/ कानुनी सल्ला देवून आम्ही आरोपीन विरुद्धध कन्हान पोलिसांना कमल ३०७ व अट्रोसिटी कायद्यात अंतर्गत कमल वाढ करण्यासाठी पोलिस अधिक्षक साहेब नागपूर यांना पत्र दिले. पोलिस अधीक्षक साहेब नागपूर यांनी लगेच तातडीने सदर अपराध क्र. ३१२/२०२४ मधील आरोपी प्रणय बावनकुळे , श्याम बावनकुळे यांचा विरुद्धध कलम ३०७ व अट्रोसिटी कायद्याच्या कलम ३ (१) (s), ३(२)(v),३ (२) (va) अंतर्गत दिनांक. १२/०५/२४ रोजी गुन्हा नोंद करवून सदर प्रकरणात कमल वाढ कन्हान पोलिसांनी केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच चौकशी अधिकारी संतोष गायकवाड साहेब आरोपी प्रणय बावनकुळे, श्याम बावनकुळे यांना अटक सुद्धा करणार आहेत. मला व माझा परिवाराला तसेच समाजाला सामाजिक कार्यकर्ते तसेच इंजी.अॅड रोशनीताई अतुल गजभिये यांनी न्याय मिळवून दिला आहे. त्याबद्दल मी व माझा परिवार इंजी.अॅड रोशनीताई अतुल गजभिये यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
रा. कन्हान पीडित फिर्यादी
जयवंत हरिदास थोरात