
मालेगाव/नाशिक, प्रतिनिधी-अनिकेत मशिदकर : शहरात पवारवाडी पोलिसांनी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत एक लाख वीस हजार रुपये किमतीचा विविध प्रकारचा पान मसाला व गुटखा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
शहरातील गोल्डन नगर भागातील मुमताज चौकात एका घरात बेकायदेशीर विक्रीसाठी गुटखा व विविध प्रकारचा पान मसाला साठा असल्याची माहिती पवारवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यांनी तेथे छापा टाकला असता तेथे एक लाख 12 हजार रुपये किमतीचा विविध प्रकारचा पान मसाला व गुटखा साठा मिळून आला. या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी कैलास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मिराज वजीर शेख (६५) रा. गोल्डन नगर या अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोउनि सुपनर हे तपास करीत आहेत.
शहरातील फार्मसी कॉलेज लगत असलेल्या एका हॉटेलमध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्या एकास पोलिसांनी गजाआड केले. या संदर्भात पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी विनोद चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अब्दुल रज्जाक एहसान अली (३५) या हॉटेल चालकास अटक करीत त्याच्याविरुद्ध पुन्हा दाखल केला आहे. पो.हवा. पवार हे तपास करीत आहेत.