
http://व्हॉलीबॉल समर कॅम्प संपन्न बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर द्वारे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित वॉलीबॉल समर कॅम्प दि. 2 मे ते 19 मे 2024 पर्यंत पार पडले. समारोपीय समारंभाला बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या पीएसआय वर्षा नैताम मॅडम आणि बल्लारपूर शहर काँग्रेसच्या वरिष्ठ कार्यकर्ता डॉ. रजनीताई हजारे व काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष घनश्यामजी मूलचंदाणी तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण हरिश शर्मा उपस्थित होते .या समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष प्रमोदजी आवते आणि सचिव काशिनाथजी सिंग आणि वरिष्ठ व्हॉलीबॉल खेळाडू खान सर उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ सिंग यांनी केले. त्यांनी बल्लारपुरामध्ये खेळाचे मैदान उपलब्ध असून खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो याबद्दल सांगितले ओमी येगीनवार , आदिवासी ग्रुप डान्स सादर करण्यात आले. स्वरांग , श्लोक , श्रुष्टि या खेळाडूंनी आपले मनोगत व्यक्त केले. वर्षा नेताम मॅडम यांनी आपल्या भाषणामध्ये गुड टच आणि बॅड टच याविषयी विस्तृत माहिती सांगितली . पालकांनी सुद्धा आपली जवाबदारी स्वीकारावी व सर्वांनी स्वतः सक्षम बनावे असे सांगितले . तसेच घनश्यामजी मूलचंदानी यांनी खेळामुळे होणाऱ्या फायद्याची माहिती दिली. तसेच रजनीताई हजारे यांनी खेळ जीवनात किती आवश्यक आहे याबद्दल सांगितले . माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी खेळाचे अनेक फायदे सांगितले. अध्यक्षीय भाषणामध्ये अध्यक्ष प्रमोद आवते सर यांनी वर्षभर आपल्या बल्लारपूर स्पोर्ट्स संघटनेद्वारे व्हॉलीबॉल चे प्रशिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सकाळी आणि सायंकाळी चालत असल्याचे सांगितले. त्याशिवाय ज्यांना वॉलीबॉल प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहनही केले. या व्हॉलीबॉल समर कॅम्प मध्ये एकूण 75 खेळाडूंनी सहभाग घेतला यामध्ये विद्यार्थ्यांना व्हॉलीबॉल चे प्राथमिक माहिती आणि प्रॅक्टिस देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद आवते यांनी या संपूर्ण कालावधीमध्ये खेळाडूंना व्हॉलीबॉल चे प्रशिकण दिले आणि त्या दरम्यान वॉलीबॉल खेळत असताना कोणत्या प्रकारच्या व्यायामाची आवश्यकता असते अशा प्रकारचे फिटनेस टेस्ट त्यांच्याकडून करवून घेतले. मध्यंतरी संजय कुबडे सर यांनी खेळाडूंना कराटे या खेळाचे प्रशिक्षण दिले. तसेच योगा ची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी याकरिता योग नृत्य परिवार चे संजय पारधी आणि तेजस्विनी येगिनवार यांनी खेळाडूंकडून योग नृत्य करून घेतले . संस्थेचे इतर वरिष्ठ खेळाडू खान सर, इनाडू सर ,भोंगाडे सर, बोबडे सर आणि प्रज्वल आवते ,राहुल चनेकर, शौनल , परमेश्वर बोटला मिलिंद दारुंडे ,निखिल नरडे, विजय दिकोंडावार आणि सर्व संस्थेचे सदस्य यांनी या समर कॅम्प ला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य दिले. संचालन झाडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन बोबडे सर यांनो केले.तसेच सर्व खेळाडूंना वोलीबॉल खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून दिले त्याबद्दल बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्था च्या वतीने महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे आभार व्यक्त करण्यात आले.