मालेगाव प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर : दहावी बारावी परीक्षा कालावधीत ग्रामीण भागात ज्यादा बस गाड्या सोडण्यात यावात या मागणीचे निवेदन भाजप युवा मोर्चाच्या वतीने येथील अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
राज्यासह शहरात दहावी बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून ग्रामीण भागातून विद्यार्थी पेपर साठी मालेगाव शहरात येतात. मात्र ग्रामीण भागातून परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त बस सेवेचा अभाव असल्यामुळे गैरसोय होते. त्यामुळे किमान परीक्षा कालावधीत अतिरिक्त बस गाड्या उपलब्ध करून देण्यात याव्यात तसेच बारावीच्या परीक्षा सुरू असून लवकरच दहावीचा देखील परीक्षा सुरू होणार आहेत.
त्यामुळे त्या काळात शहरातील वाहतूक व्यवस्थेवर त्याचा अतिरिक्त ताण पडणार असल्यामुळे पोलिसांनी देखील शहरात मुख्य चौकामध्ये, शाळेजवळील मुख्य चौक येथे वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्यात यावी तसेच जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन देताना मोहन पुंडलिक कांबळे, संदीप भगवान मोरे, गणेश भालेराव, यश आगरकर, निलेश सोनवणे, सौरभ अक्कर, उपस्थित होते.