मालेगाव शहरामध्ये मराठा आरक्षणाचे स्वागत.

मालेगाव शहरामध्ये मराठा आरक्षणाचे स्वागत करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

मालेगाव प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर : शासनाने मराठा समाजाला स्वतंत्रपणे शैक्षणिक अनुक्रम मध्ये दहा टक्के आरक्षण जाहीर केल्याने येथील पालकमंत्री भुसे यांच्या कार्यालयासमोर मराठा समाजाकडून फटाक्यांची आतषबाजी करीत निर्णयाचे स्वागत करण्यात आले. तसेच मराठा समाजाकडून एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही देण्यात आल्या.

     राज्य शासनाकडून स्थापन केलेल्या मागासवर्गीय आयोगाकडून 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत राज्यातील मराठा समाजाचे मागासलेपणासह खुल्या प्रवर्गाचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मराठा समाजाला स्वतंत्रपणे शैक्षणिक व नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण जाहीर केले. त्या अनुषंगाने पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या पक्ष कार्यालयासमोर दुपारी मराठा समाज बांधवांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयाचे स्वागत करीत फटाक्यांची आतषबाजी केली.

     याप्रसंगी मनोहर बच्छाव, सुनील देवरे, निलेश आहेर, तानाजी देशमुख, मनीषा अहिरे, साधना सोनवणे, चंदा महाले, प्रतिभा हिरे उपस्थित होते.

Exit mobile version