चाकूचा धाक दाखवत दहशत; आरोपी गजाआड

मालेगाव परिसरात चाकूचा धाक दाखवणारा आरोपी गजाआड

मालेगाव प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर : शहरात चाकूचा धाक दाखवून परिसरात दहशत माजविणाऱ्या एका हिस्टरीशीटर गुन्हेगाराला एका धारदार शस्त्रासह छावणी पोलिसांनी ताब्यात घेत जेलबंद केले. तसेच न्यायालयाने गुन्हेगाराची तुरुंगात रवानगी केली आहे.

     छावणी पोलिसात दि. १७ रोजी दीपक मधुकर जाधव हा तरुण चार चाकी वाहन पार्किंग करत असताना संशयित गणेश राजेंद्र वडगे (रा. मालेगाव) याने जाधवशी वाहन पार्किंग वरून वाद घातला. तसेच शिवीगाळ करीत धारदार चाकूने वार करून जखमी केले. तर संशयित आरोपी गणेश वडगेने काढलेल्या धारदार शस्त्रामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाल्याने एकच धावपळ उडाली होती. याप्रकरणी छावली पोलीस ठाणे सह विविध पोलीस ठाण्यामध्ये फार्म ऍक्ट सह विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच दहशत माजविणाऱ्या संशयीतांमुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये म्हणून पोलिसांच्या शोध पथकाने गणेश वडगे ला एका धारदार सुऱ्यासह ताब्यात घेत अटक केली.

     त्यास न्यायालयात हजर केले असता जिल्हा अप्पर सत्र न्यायालयाने संबंधित संशयित आरोपीची तुरुंगात रवानगी केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक भगवान कोळी करीत आहेत.

 

Exit mobile version