महाराष्ट्र. राज्यात उष्णतेची लाट….

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात उष्णतेची लाट, पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाचा हायअलर्ट

लातूर रिपोर्टर.पुढील 24 तासांत महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. उन्हाळा सुरु झाला असून सर्वत्र रखरखत्या उन्हाचा सामना लोकांना करावा लागत आहे.पुणे, मुंबई, ठाण्यात उन्हाच्या झळा असून अकोल्यात 41 अंश सेल्सियस तापमान जाईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात हवानात कोरडं असणार आहे.एकीकडे कडक ऊन तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस वर्तवला आहे. मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता काही विदर्भात वर्तवली आहे.दरम्यान, गेल्या दोन तीन दिवसांपासून नागपूर आणि लातूरमध्ये रिमझिम होती.येत्या 24 तासात राज्यांत उन्हाच्या तीव्रतेमुळे हायअलर्ट सांगितला आहे.

Exit mobile version