कल्याण वाहतूक शाखेच्या ट्युनिंग व्हॅन वाहन उचलायला असतांना वाहन मालक समोर असतांना देखील कारवाई करत आहेत बघून मालकाने विचारणा केली असता अधिकारी कर्मचारी हे काहीच उत्तर नादेता कारवाई करत असल्याने वाहन मालक विनंती करून देखील अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे पाहून वाहन मालक चक्क ट्युनिंग व्हॅन च्या खाली झोपल्याने अधिकारी कर्मचारी यांची फजिती झाली. त्यांनी मालकास वाहणाजवळ उभे असतांना कोणत्याच परकारची सूचना दिली नसल्याचे घटना घडलेल्या ठिकाणी असणारे नागरिकांनी सांगितले. तसेच ट्युनिंग व्हॅन फिर्तीवर असतांना मेगाफोन चा आवाज देखील कमी असतो असेही नागरिक वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज ठाणे जिल्हा मुख्य प्रतिनिधी यांच्या बरोबर संवाद साधतांना त्यांचे मनोगत वेक्त करत होते.