
पुणे, २३ फेब्रुवारी २०२४ : सर्वत्र आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. अशातच सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, मनसेने पुणे जिल्ह्याची जबाबदारी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर दिली आहे. अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरणार का? असा सवाल त्यांना केला असताना अमित ठाकरे यांनी थेट उत्तर दिलं आहे. ‘माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही, पुणे लोकसभेच्या जागेवरील प्रश्नावर प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर निवडणूक लढण्याची इच्छा नाही पण राज ठाकरे यांनी जबाबदारी दिल्यास यशस्वी पार पाडणार असल्याचे त्यांनी म्हटले. इतकंच नाहीतर राज ठाकरे यांनी नगरसेवक, सरपंच पदाची जबाबदारी दिली तरी पार पाडेन’, असही म्हटले आहे. तर पुण्यातून लोकसभा लढवणार आहे. पण माझी स्वत:ची निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे माध्यमांना सांगितले आहे