A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedअन्य खबरेमहाराष्ट्र

महाराष्ट्र. शिवसैनिक झाले आक्रमक…..

Pune Metro : शिवसैनिकांनी 'बुधवार पेठ' स्टेशनचं नाव बदललं, मेट्रो स्थानकात जाऊन लावली पाटी

लातूर प्रतिनिधी.पुणे मेट्रो विरोधात ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. पुणे शहरातील बुधवार पेठ मेट्रो स्टेशनच्या नावाचा नवा वाद समोर आला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी बुधवार पेठ स्थानक नावाचा बोर्ड तोडला आहे. हा बोर्ड तोडून शिवसैनिकांनी तिथे कसबा पेठ स्थानक असा बोर्ड लावला आहे. शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे आणि शिवसैनिकांनी आक्रमक आंदोलन करून बोर्ड लावला.पुण्याची मेट्रो काही ना काही कारणास्तव नेहमीच चर्चेत राहिली आहे. याआधीही शिवसेनेकडून नाव बदलून कसबा पेठ स्थानक नाव द्या अशी मागणी करण्यात आली होती.

दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने मेट्रो ऑफिसला घेराव घातला आहे. रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो सेवा सुरू का करत नाही? असा जाब शिवसैनिकांनी मेट्रो प्रशासनाला विचारला. आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी गेटवरच अडवलं, तर काही शिवसैनिक आत घुसले.

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!