
महाराष्ट्र :छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद)
वाळूज महनगर प्रतिनिधी
दोन दिवसा पूर्वी लीना श्रीराम पाटील नावाच्या तरुणीने गरुड झेप करिअर अकॅडमीच्या होस्टेलच्या बाथरूम मध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. लीनाच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की संस्था चालक आणि संस्थेचे अन्य दोन मॅनेजिंग डायरेक्टर यांनी मुलीचा मानसिक व शारीरिक छळ करून तीला आत्महत्येस प्रवृत्त केले. या तक्रारीवरून एम्. आय. डी .सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. संस्थाचालक सुरेश सोनवणे व निलेश सोनवणे अज्ञात ठिकाणीं आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. गुन्ह्या संदर्भात अजून काही पुरावे हाती लागतात काय? याचा तपास घेण्यासाठी खुद्द पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी गरुड अकॅडमी वर छापा टाकत महत्त्वाचे रेकॉर्ड जप्त केले. माध्यमांशी बोलताना उपायुक्त म्हणाले की लीना श्रीराम पाटील या तरुणीचा मृत्यू खेदजनक आहे आमची पोलीस यंत्रणा नक्कीच तिला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जाहिरातीच्या माध्यमातून ही करिअर अकॅडमी अधिकारी घडवते अशा खोट्या जाहिराती जर फसवणुकीच्या वाटल्या तर त्या अनुषंगाने देखील कारवाई करू असे देखील बोलताना ते म्हणाले. या कार्यवाहीदरम्यान पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी संपूर्ण सेंटरची बारकाईने पाणी केली. त्या पाहणी दरम्यान त्यांना काय त्रुटी देखील आढळून आल्या. त्या संदर्भात करिअरच्या अकॅडमीच्या विद्यार्थ्याशी संवाद देखील साधला.